गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा की सभी को हार्दिक शुभकामनाएँ !!! मैंने यह कविता 2015 के गुरुपौर्णिमा के अवसर पर अपने बेटे नहुष के गुरुओं के लिए लिखी थी l गुरू हमारे मातापिता होते हैं हमारे गुरू और गुरू होते हैं हमारे शिक्षक इनके बिना अधूरा है हमारी जिंदगी का कथानक l जब छोटे थे तब, माँ बनी पहली गुरू l जिंदगी में कठिनाइयां आनी हुईं शुरु, तो पिताजी बने गुरू l स्कूल और कॉलेज में मिले, शिक्षक के रूप में गुरू l ईन सबके के कारण जिंदगी की नाव, सुरक्षित तैरना हुई शुरु l इतना ही नहीं तो, संगीत और खेल के मैदान में भी मिले गुरू l यह सब बने खेवट, मेरी जिंदगी की नाव के l मैंने भी कर दी, अपनी नाव हवाले इनके l इनके बताये हुए रास्ते पर, चलने की है मैंने ठानी l नहीं करूँगा इनके आगे, कभी अपनी मनमानी l गुरुपूर्णिमा के इस पावन अवसर पर अपने सारे गुरुओं को मैं तहे दिल से याद करता हूँ और आप सभी के चरणों में अपना सादर प्रणाम करता हूँ l🙏🙏 - वैशाली
Posts
कोरोनाचा कहर
- Get link
- X
- Other Apps
कोरोनाचा कहर कोरोनाच्या कहराने जग निघतेय ढवळून पण काही महाभाग फिरताय क्षुल्लक कारण काढून घरात राहणे आणि सतत हात धुणे आहे सोप्पा उपाय जनतेला याहून दुसरा नाही तरणोपाय अस्वच्छ हातांनी चेहर्याला स्पर्श करणे टाळा तरच बसेल करोनाला आळा असेल गरज तरच घराबाहेर निघा मास्क किंवा रुमाल तेव्हा जरूर वापरा शिकतांना वा खोकतांना वापरा टिश्यू पेपर किंवा वापरावे हात दुमडून आपले कोपर बाहेर पडल्यावर शक्यतोवर ग्लोव्हज् वापरा अन् एकमेकांपासून सुरक्षित अंतर पाळा आजारी लोकांपासून स्वतः ला दूर ठेवा तरच बसेल जीवघेण्या करोनाला आळा प्रशासनाचे नियम पाळण्यात करू नका दिरंगाई कारण आपल्याला जिंकायची आहे ही कोरोना विरूद्धची लढाई. - वैशाली
जिंदगी
- Get link
- X
- Other Apps
जिंदगी यह जिंदगी है जनाब, यहाँ हर एक का दिन आता है ! इतनासा खुली आँखोंसे न दिखनेवाला जीव..... कोरोना एक विषाणू जिसने पूरी दुनिया में भयंकर हलचल मचा दी हैं जिसके कारण बडे बडे राष्ट्र लाॅकडाऊन कर रहे हैं कभी सोचा था किसीने कि इस तरह एक अल्ट्रा नॅनो व्हायरस के कारण कई दिनों तक घर में बैठना पडेगा? यह जिंदगी है जनाब, यहाँ हर किसीके दिन आते है ! किसने सोचा था कि सॅनिटायझर, साबुन और टिश्यू पेपरज् के इतने अच्छे दिन आयेंगे कि सुपरमार्केट में घुसते ही नजरें पहले इन्ही को ढूंढेंगी ऐसाही कुछ इन्सानों के साथ भी हो सकता हैं कभी सोचा है आपने इसलिए कभी किसीको कम मत समझिए सबको उनका आदर सम्मान दीजिए क्या पता जब आपको जरूरत हो तब यही लोग आपके काम आ जाए क्योंकि यह जिंदगी है जनाब यहाँ वक्त बदलते देर नहीं लगती और हाँ यहाँ हर एक का दिन आता ही आता है जनाब !!! - वैशाली
विश्वास
- Get link
- X
- Other Apps
विश्वास मनाने जुळलेले नाते टिकवायला ठेवावा विश्वास समोरच्याने तो ठेवला तर आपणही जपावा हमखास आपल्या भल्यासाठी कोणी करत असेल धडपड काही तर आपणही साथ द्यावी क्षुल्लक कारणांमुळे फिरू नये माघारी विश्वास तुटला की लागते जिव्हारी पैसे किंवा तत्सम कारणांमुळे नात्यात येते वितुष्ट पण त्याहीपेक्षा दारुण हे की करणारा खचतो, तुटतो मनातनं त्याने तुमच्यावर ठेवलेल्या विश्वासाच्या चिथड्या होतात आणि आत्तापर्यंतच्या सुंदर, अवीट मैत्रीच्या धाग्याला गाठी पडतात गाठी सोडवता येतात खऱ्या पण सुटल्यावरही राहतात त्या खुणा ते नातं नंतर जुळले तरीही आधीसारखं फुलणं आता अवघड होवून जातं आणि एक गोड नातं मग कायमचच जडं होवून जातं......!!! - वैशाली
प्रेम 💞
- Get link
- X
- Other Apps
प्रेम 💞 प्रेम, प्रेम, प्रेम काय असतं हे प्रेम ? कसं आणि कुणासारखं दिसतं हे प्रेम ? प्रेम प्रेमच असतं अन् प्रेमासारखचं दिसतं आईने मुलांवर केलेलं प्रेम प्रेमच असतं राजाने राणीवर केलेलं प्रेमही प्रेमच असतं वेड्या मजनूने लैलावर केलेलं प्रेमही प्रेमच असतं इतकचं काय पण मित्राने मैत्रिणीवर केलेलं प्रेमही प्रेमच असतं दर वेळी बदलतो तो कर्ता आणि त्याच्या त्यामागील भावना म्हणूनच बदलतात त्यातील अर्थ अन् संदर्भही कधी आई - मुले, कधी नवरा - बायको, कधी प्रियकर - प्रेयसी तर कधी मित्र - मैत्रीण तुझ्या- माझ्यासारखे पण म्हणून प्रेम बदलत नाही ते तसचं राहतं प्रेमासारखं अथांग आणि अफाट समुद्रासारखं...... !!! - वैशाली
कोण तो ? 🤔
- Get link
- X
- Other Apps
कोण तो ? चालले होते एकटीच रस्त्याने आपल्याच नादात, रिकाम्या मनाने अचानकपणे तो आला आणि मी मनातच चरकले त्याला टाळावे म्हणून झपाझप चालू लागले पण तो तर खूपच निग्रही माझ्यापेक्षाही दुप्पट वेगाने येवून शेवटी गाठलेच त्याने मला माझी नकारघंटाही नंतर संथावली कारण त्याने माझ्या डोक्यात त्याची जागा पक्की केली तरीही अजून चालतच होते मी रस्त्याने पण आता एकटी नाही तर त्याच्याच नादात, त्याच्याच गतीने मनाचं माहीत नाही पण डोकं मात्र गच्च झालेलं रस्ता एव्हाना एका वळणावर येवून पोहचला होता पण त्याचा माझ्यासोबत चालण्याचा पूर्वीचाच वेग कायम होता अशी बरीच वळणं गेली आणि माझे घर माझ्या नजरेच्या टप्प्यात आले मी त्याला म्हणाले, " निघ तू आता, मी पोहचेन नीट माझ्या घरी." पण तो तयारच नव्हता ऐकायला म्हणून जा म्हणाले तरीही येतच राहिला माझ्या सोबतीला शेवटी माझाच रस्ता संपला आणि मी थांबले पण तरीही हा सुरूच.... थांबेलही कसा म्हणा तो..... कारण डोक्यात आलेला विचारच तो रस्ता संपला असला तरी चालतच राहणारा विकारांवर स्वतः विजय मिळविणारा!!! ...