प्रेम 💞

प्रेम 💞

प्रेम, प्रेम, प्रेम काय असतं हे प्रेम ?
कसं आणि कुणासारखं दिसतं हे प्रेम ?
प्रेम प्रेमच असतं अन् प्रेमासारखचं दिसतं
आईने मुलांवर केलेलं प्रेम प्रेमच असतं
राजाने राणीवर केलेलं प्रेमही प्रेमच असतं
वेड्या मजनूने लैलावर केलेलं प्रेमही प्रेमच असतं
इतकचं काय पण मित्राने मैत्रिणीवर
केलेलं प्रेमही प्रेमच असतं
दर वेळी बदलतो तो कर्ता आणि 
त्याच्या त्यामागील भावना 
म्हणूनच बदलतात त्यातील अर्थ अन्‌ संदर्भही
कधी आई - मुले, कधी नवरा - बायको,
कधी प्रियकर - प्रेयसी तर कधी
मित्र - मैत्रीण तुझ्या- माझ्यासारखे
पण म्हणून प्रेम बदलत नाही
ते तसचं राहतं प्रेमासारखं
अथांग आणि अफाट समुद्रासारखं...... !!!

                                           - वैशाली 

Comments

Popular posts from this blog

जिंदगी