विश्‍वास

विश्‍वास

मनाने जुळलेले नाते
टिकवायला ठेवावा विश्वास
समोरच्याने तो ठेवला
तर आपणही जपावा हमखास
आपल्या भल्यासाठी कोणी
करत असेल धडपड काही
तर आपणही साथ द्यावी
क्षुल्लक कारणांमुळे फिरू नये माघारी
विश्वास तुटला की लागते जिव्हारी
पैसे किंवा तत्सम कारणांमुळे
नात्यात येते वितुष्ट पण
त्याहीपेक्षा दारुण हे की करणारा
खचतो, तुटतो मनातनं
त्याने तुमच्यावर ठेवलेल्या
विश्वासाच्या चिथड्या होतात
आणि आत्तापर्यंतच्या सुंदर, अवीट
मैत्रीच्या धाग्याला गाठी पडतात
गाठी सोडवता येतात खऱ्या
पण सुटल्यावरही राहतात त्या खुणा
ते नातं नंतर जुळले तरीही
आधीसारखं फुलणं आता
अवघड होवून जातं आणि
एक गोड नातं मग कायमचच
जडं होवून जातं......!!!

                               - वैशाली

Comments