कोरोनाचा कहर
कोरोनाचा कहर
कोरोनाच्या कहराने जग निघतेय ढवळून
पण काही महाभाग फिरताय क्षुल्लक कारण काढून
घरात राहणे आणि सतत हात धुणे आहे सोप्पा उपाय
जनतेला याहून दुसरा नाही तरणोपाय
अस्वच्छ हातांनी चेहर्याला स्पर्श करणे टाळा
तरच बसेल करोनाला आळा
असेल गरज तरच घराबाहेर निघा
मास्क किंवा रुमाल तेव्हा जरूर वापरा
शिकतांना वा खोकतांना वापरा टिश्यू पेपर
किंवा वापरावे हात दुमडून आपले कोपर
बाहेर पडल्यावर शक्यतोवर ग्लोव्हज् वापरा
अन् एकमेकांपासून सुरक्षित अंतर पाळा
आजारी लोकांपासून स्वतः ला दूर ठेवा
तरच बसेल जीवघेण्या करोनाला आळा
प्रशासनाचे नियम पाळण्यात करू नका दिरंगाई
कारण आपल्याला जिंकायची आहे ही
कोरोना विरूद्धची लढाई.
- वैशाली
Comments
Post a Comment