कोण तो ? 🤔
कोण तो ?
चालले होते एकटीच रस्त्याने
आपल्याच नादात, रिकाम्या मनाने
अचानकपणे तो आला आणि
मी मनातच चरकले
त्याला टाळावे म्हणून
झपाझप चालू लागले
पण तो तर खूपच निग्रही
माझ्यापेक्षाही दुप्पट वेगाने
येवून शेवटी गाठलेच त्याने मला
माझी नकारघंटाही नंतर संथावली
कारण त्याने माझ्या डोक्यात
त्याची जागा पक्की केली
तरीही अजून चालतच होते मी रस्त्याने
पण आता एकटी नाही तर
त्याच्याच नादात, त्याच्याच गतीने
मनाचं माहीत नाही पण
डोकं मात्र गच्च झालेलं
रस्ता एव्हाना एका वळणावर
येवून पोहचला होता
पण त्याचा माझ्यासोबत चालण्याचा
पूर्वीचाच वेग कायम होता
अशी बरीच वळणं गेली
आणि माझे घर माझ्या नजरेच्या टप्प्यात आले
मी त्याला म्हणाले, " निघ तू आता,
मी पोहचेन नीट माझ्या घरी."
पण तो तयारच नव्हता ऐकायला
म्हणून जा म्हणाले तरीही
येतच राहिला माझ्या सोबतीला
शेवटी माझाच रस्ता संपला
आणि मी थांबले पण
तरीही हा सुरूच....
थांबेलही कसा म्हणा तो.....
कारण डोक्यात आलेला विचारच तो
रस्ता संपला असला तरी चालतच राहणारा
विकारांवर स्वतः विजय मिळविणारा!!!
- वैशाली
चालले होते एकटीच रस्त्याने
आपल्याच नादात, रिकाम्या मनाने
अचानकपणे तो आला आणि
मी मनातच चरकले
त्याला टाळावे म्हणून
झपाझप चालू लागले
पण तो तर खूपच निग्रही
माझ्यापेक्षाही दुप्पट वेगाने
येवून शेवटी गाठलेच त्याने मला
माझी नकारघंटाही नंतर संथावली
कारण त्याने माझ्या डोक्यात
त्याची जागा पक्की केली
तरीही अजून चालतच होते मी रस्त्याने
पण आता एकटी नाही तर
त्याच्याच नादात, त्याच्याच गतीने
मनाचं माहीत नाही पण
डोकं मात्र गच्च झालेलं
रस्ता एव्हाना एका वळणावर
येवून पोहचला होता
पण त्याचा माझ्यासोबत चालण्याचा
पूर्वीचाच वेग कायम होता
अशी बरीच वळणं गेली
आणि माझे घर माझ्या नजरेच्या टप्प्यात आले
मी त्याला म्हणाले, " निघ तू आता,
मी पोहचेन नीट माझ्या घरी."
पण तो तयारच नव्हता ऐकायला
म्हणून जा म्हणाले तरीही
येतच राहिला माझ्या सोबतीला
शेवटी माझाच रस्ता संपला
आणि मी थांबले पण
तरीही हा सुरूच....
थांबेलही कसा म्हणा तो.....
कारण डोक्यात आलेला विचारच तो
रस्ता संपला असला तरी चालतच राहणारा
विकारांवर स्वतः विजय मिळविणारा!!!
- वैशाली
Comments
Post a Comment