Posts

Showing posts from May, 2019

विश्‍वास

विश्‍वास मनाने जुळलेले नाते टिकवायला ठेवावा विश्वास समोरच्याने तो ठेवला तर आपणही जपावा हमखास आपल्या भल्यासाठी कोणी करत असेल धडपड काही तर आपणही साथ द्यावी क्षुल्लक कारणांमुळे फिरू नये माघारी विश्वास तुटला की लागते जिव्हारी पैसे किंवा तत्सम कारणांमुळे नात्यात येते वितुष्ट पण त्याहीपेक्षा दारुण हे की करणारा खचतो, तुटतो मनातनं त्याने तुमच्यावर ठेवलेल्या विश्वासाच्या चिथड्या होतात आणि आत्तापर्यंतच्या सुंदर, अवीट मैत्रीच्या धाग्याला गाठी पडतात गाठी सोडवता येतात खऱ्या पण सुटल्यावरही राहतात त्या खुणा ते नातं नंतर जुळले तरीही आधीसारखं फुलणं आता अवघड होवून जातं आणि एक गोड नातं मग कायमचच जडं होवून जातं......!!!                                - वैशाली

प्रेम 💞

प्रेम 💞 प्रेम, प्रेम, प्रेम काय असतं हे प्रेम ? कसं आणि कुणासारखं दिसतं हे प्रेम ? प्रेम प्रेमच असतं अन् प्रेमासारखचं दिसतं आईने मुलांवर केलेलं प्रेम प्रेमच असतं राजाने राणीवर केलेलं प्रेमही प्रेमच असतं वेड्या मजनूने लैलावर केलेलं प्रेमही प्रेमच असतं इतकचं काय पण मित्राने मैत्रिणीवर केलेलं प्रेमही प्रेमच असतं दर वेळी बदलतो तो कर्ता आणि  त्याच्या त्यामागील भावना  म्हणूनच बदलतात त्यातील अर्थ अन्‌ संदर्भही कधी आई - मुले, कधी नवरा - बायको, कधी प्रियकर - प्रेयसी तर कधी मित्र - मैत्रीण तुझ्या- माझ्यासारखे पण म्हणून प्रेम बदलत नाही ते तसचं राहतं प्रेमासारखं अथांग आणि अफाट समुद्रासारखं...... !!!                                            - वैशाली 

कोण तो ? 🤔

कोण तो ? चालले होते एकटीच रस्त्याने आपल्याच नादात, रिकाम्या मनाने अचानकपणे तो आला आणि मी मनातच चरकले त्याला टाळावे म्हणून झपाझप चालू लागले पण तो तर खूपच निग्रही माझ्यापेक्षाही दुप्पट वेगाने येवून शेवटी गाठलेच त्याने मला माझी नकारघंटाही नंतर संथावली कारण त्याने माझ्या डोक्यात त्याची जागा पक्की केली तरीही अजून चालतच होते मी रस्त्याने पण आता एकटी नाही तर त्याच्याच नादात, त्याच्याच गतीने मनाचं माहीत नाही पण डोकं मात्र गच्च झालेलं रस्ता एव्हाना एका वळणावर येवून पोहचला होता पण त्याचा माझ्यासोबत चालण्याचा पूर्वीचाच वेग कायम होता अशी बरीच वळणं गेली आणि माझे घर माझ्या नजरेच्या टप्प्यात आले मी त्याला म्हणाले, "  निघ तू आता, मी पोहचेन नीट माझ्या घरी." पण तो तयारच नव्हता ऐकायला म्हणून जा म्हणाले तरीही येतच राहिला माझ्या सोबतीला शेवटी माझाच रस्ता संपला आणि मी थांबले पण तरीही हा सुरूच.... थांबेलही कसा म्हणा तो..... कारण डोक्यात आलेला विचारच  तो रस्ता संपला असला तरी चालतच राहणारा विकारांवर स्वतः विजय मिळविणारा!!!            ...

आई

आई  घराचा कोपरा न् कोपरा स्वच्छ ठेवायला झटणारी व्यक्ती म्हणजे आई असते घराच्या खर्चाचे अंदाजपत्रक आखणारी व्यक्ती आई असते घर खर्चातून नकळत एक ठराविक रक्कम कपाटाच्या कुठल्याशा एका कोपर्‍यात जमा करणारी व्यक्ती म्हणजे आई असते ऐन वेळेला नड आलीच तर तीच साठवणूक बाबांच्या हातात ठेवणारी व्यक्ती आई असते घरातल्यांच्या तर्‍हा सांभाळत, सगळ्यांची आवडनिवड जपणारी व्यक्ती म्हणजे आई असते कधी प्रेमाने तर कधी कठोर होवून मुलांना शिस्त लावणारी व्यक्ती म्हणजे आई असते घरातल्या कुणाचे काही दुखले खुपले तर त्यावर मायेने फुंकर घालणारी व्यक्ती म्हणजे आई असते हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई धर्म कुठलाही असला तरी आयुष्यभराचे संस्कार देणारी व्यक्ती म्हणजे आई आणि फक्‍त आपली आईच असते.                             - वैशाली

आम्ही गृहिणी

आम्ही गृहिणी आजकालच्या आम्ही गृहिणी नाही साध्या भोळ्या,  आहोत आम्ही हुशार आणि चुणचुणीत,😄 म्हणुनच संसार चाललेय खणखणीत.  आमच्या 'अहो ' ना काही काम सांगायची सोयच नसते  कारण स्वारी बिचारी बॉस आणि ऑफिस  यातच व्यग्र असते ☹️ घरचे आणि बाहेरचे काम, स्वयंपाक, मुले आणि अभ्यास  यातच जातात आमचे तासन तास तरीही चेहर्‍यावर आमच्या हास्य दिलखुलास 🤩 दिवस सरतो कसा कळतच नाही संध्याकाळी पुन्हा तीच स्वयंपाकाची घाई  काय बरे करावे 🤔 विचार करताना डोक्याचा होतो भुगा आवडीचा मेनू नसला तर सगळे करतात त्रागा. 😏 घरात माणसं इनमिन तीन किंवा चार 👨‍👩‍👧‍👦 पण त्यांच्या आवडीचा समन्वय  साधताना आम्ही होतो बेजार. 🙃 एवढे करूनही कौतुकाची थाप मिळेलच  ही शाश्वती नाही  पुन्हा पुन्हा मागून खाल्लेच तर  अस्मादिक समजून जाई 😄 त्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद आणि समाधान वाचण्यात आता झालोय आम्ही पटाईत 😉 कारण आम्ही आहोत आजकालच्या गृहिणी  हुशाऽऽऽऽऽर आणि चुणचुणीत 😀😀                ...