आम्ही गृहिणी
आम्ही गृहिणी
आजकालच्या आम्ही गृहिणी
नाही साध्या भोळ्या,
आहोत आम्ही हुशार आणि चुणचुणीत,😄
म्हणुनच संसार चाललेय खणखणीत.
आमच्या 'अहो ' ना काही काम
सांगायची सोयच नसते
कारण स्वारी बिचारी बॉस आणि ऑफिस
यातच व्यग्र असते ☹️
घरचे आणि बाहेरचे काम, स्वयंपाक, मुले आणि अभ्यास
यातच जातात आमचे तासन तास
तरीही चेहर्यावर आमच्या हास्य दिलखुलास 🤩
दिवस सरतो कसा कळतच नाही
संध्याकाळी पुन्हा तीच स्वयंपाकाची घाई
काय बरे करावे 🤔 विचार करताना डोक्याचा होतो भुगा
आवडीचा मेनू नसला तर सगळे करतात त्रागा. 😏
घरात माणसं इनमिन तीन किंवा चार 👨👩👧👦
पण त्यांच्या आवडीचा समन्वय
साधताना आम्ही होतो बेजार. 🙃
एवढे करूनही कौतुकाची थाप मिळेलच
ही शाश्वती नाही
पुन्हा पुन्हा मागून खाल्लेच तर
अस्मादिक समजून जाई 😄
त्यांच्या चेहर्यावरचा आनंद आणि समाधान
वाचण्यात आता झालोय आम्ही पटाईत 😉
कारण आम्ही आहोत आजकालच्या गृहिणी
हुशाऽऽऽऽऽर आणि चुणचुणीत 😀😀
- वैशाली
Comments
Post a Comment