आई
आई
घराचा कोपरा न् कोपरा
स्वच्छ ठेवायला झटणारी
व्यक्ती म्हणजे आई असते
घराच्या खर्चाचे अंदाजपत्रक
आखणारी व्यक्ती आई असते
घर खर्चातून नकळत एक ठराविक
रक्कम कपाटाच्या कुठल्याशा
एका कोपर्यात जमा करणारी
व्यक्ती म्हणजे आई असते
ऐन वेळेला नड आलीच तर
तीच साठवणूक बाबांच्या हातात
ठेवणारी व्यक्ती आई असते
घरातल्यांच्या तर्हा सांभाळत,
सगळ्यांची आवडनिवड जपणारी
व्यक्ती म्हणजे आई असते
कधी प्रेमाने तर कधी कठोर
होवून मुलांना शिस्त लावणारी
व्यक्ती म्हणजे आई असते
घरातल्या कुणाचे काही
दुखले खुपले तर त्यावर
मायेने फुंकर घालणारी
व्यक्ती म्हणजे आई असते
हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई
धर्म कुठलाही असला तरी
आयुष्यभराचे संस्कार देणारी
व्यक्ती म्हणजे आई आणि
फक्त आपली आईच असते.
- वैशाली
घराचा कोपरा न् कोपरा
स्वच्छ ठेवायला झटणारी
व्यक्ती म्हणजे आई असते
घराच्या खर्चाचे अंदाजपत्रक
आखणारी व्यक्ती आई असते
घर खर्चातून नकळत एक ठराविक
रक्कम कपाटाच्या कुठल्याशा
एका कोपर्यात जमा करणारी
व्यक्ती म्हणजे आई असते
ऐन वेळेला नड आलीच तर
तीच साठवणूक बाबांच्या हातात
ठेवणारी व्यक्ती आई असते
घरातल्यांच्या तर्हा सांभाळत,
सगळ्यांची आवडनिवड जपणारी
व्यक्ती म्हणजे आई असते
कधी प्रेमाने तर कधी कठोर
होवून मुलांना शिस्त लावणारी
व्यक्ती म्हणजे आई असते
घरातल्या कुणाचे काही
दुखले खुपले तर त्यावर
मायेने फुंकर घालणारी
व्यक्ती म्हणजे आई असते
हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई
धर्म कुठलाही असला तरी
आयुष्यभराचे संस्कार देणारी
व्यक्ती म्हणजे आई आणि
फक्त आपली आईच असते.
- वैशाली
Nice one vaishu
ReplyDeleteAaila paryay nahi...