RAM
राम
सगळ्यांच्या जीवनात आणि
जगण्यात राम असावा
काम, क्रोध, मोह, माया, मत्सर
आदि अवगुणांना आपल्या
जीवनात थारा नसावा
राम म्हणजे राष्ट्राचा प्राण
राम म्हणजे सत्पथ, सन्माार्ग
राम म्हणजे सुसंस्कार
राम म्हणजे धकाधकीच्या जीवनाचा विसावा
राम म्हणजे आदर्श विचार
राम म्हणजे आपली संस्कृती
जी आपण करायला हवी जतन
दोनदा 'राम राम' म्हणणे म्हणजे
एक माळ पूर्ण जपणे
एवढा मोठा "राम" या शब्दाचा
आवाका असणारा राम
आपल्या सगळ्यांच्या जीवनात
आणि जगण्यात असावा
हीच या रामनवमीच्या निमित्याने
सगळ्यांसाठी माझी सदिच्छा !!!
" जय श्रीराम! "
- वैशाली
Comments
Post a Comment