नववर्षाभिनंदन
नववर्षाभिनंदन
स्वागत आहे हे नववर्षा तुझे,
अगदी मनापासून स्वागत आहे
आज पहिलाच दिवस तुझा म्हणून
आमच्याही मनात आनंदाची उर्मी आहे
आणि आहे औत्सुक्यही, काय दडलंय तुझ्यात
आणखी नवीन काही याचे
सुखाचे, दुःखाचे आणि आश्चर्याचे
अपेक्षित आणि अनपेक्षित धक्के
असतील तुझ्या ओंजळीत आमच्यासाठी
म्हणून दे शक्ति ते धक्के पचविण्यासाठी
नव वर्ष सकारात्मक असावे ही आस मनाची
याच सकाराने जपूया बांधिलकी नात्यांची!!!
- वैशाली
Great congrats..happy new year 👌👍
ReplyDeleteख़ूबच सुंदर, काय जबरदस्त लिहतेस ग।
ReplyDeleteKhupach Chan lihile ashes..masttt👌👌👌
ReplyDeleteVery nice.
ReplyDelete